अजित पवारांना राज्यात कोरोनाचे संकट भीषण झालेले असतानाही दोनदा पंढरपुरात येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागले. हा त्यांचा स्वभाव नाही, तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचे हे लक्षण असल्याचे पाटील म्हणाले. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असे दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक भाजप जिंकणार हे स्पष्ट आहे,''असल्याचे पाटील म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics